‘भाषेचा अभ्यास म्हणजे काहीतरी क्लिष्ट आणि तर्ककर्कश’, हा समज खोडून काढणारी, हसत-खेळत भाषासन्मुख करत अभ्यासप्रवृत्त करणारी पुस्तके
आज भाषेच्या क्षेत्रात मोठी घुसळण चाललेली दिसून येते. उपयोजित मराठीचा गांभीर्याने विचार करणाऱ्या आणि ते उपयोजन जास्तीत जास्त नेमके, समावेशक आणि अर्थपूर्ण कसे होईल, हे बघणाऱ्या लेखनाचा तुटवडा आज समाजात आहे. ती उणीव या तीन पुस्तकांनी भरून येईल, अशी आशा आहे. हे लेखन वाचताना, लेखिकेकडून भाषाज्ञानाबरोबरच तिच्या ज्ञाननिष्ठेचा वसाही घेण्यासारखा आहे.......